मुक्ताईनगर तालुक्यात डोलारखेडा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने बुधवारी दि. २५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नैराश्यातून अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा उपचारादरम्यान गुरुवारी दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमेश मुरलीधर कोळी (वय ५६, रा. डोलारखेडा ता. मुक्ताईनगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होते.शेतीकाम करून उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)दरम्यान, बुधवारी दि. २५ जून रोजी घराजवळ असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास रमेश कोळी यांनी पेट्रोल अंगावर टाकून स्वतःला जाळून घेतले. कुटुंबियांना समजताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना २४ तासात रमेश कोळी यांचा उपचारादरम्यान गुरुवारी दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला.(केसीएन)यावेळी परिवाराने शोक व्यक्त केला. या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली असून डोलारखेडा येथे शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.