पारोळा तालुक्यातील शेळावे बु. येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथील ६२ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पाणी काढत असताना पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना दि.६ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
समाधान वासुदेव पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिली. दि.६ रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्यांचे वडील वासुदेव त्र्यंबक पाटील (वय ६२ वर्षे) हे चिखलोड शिवारातील शेतात कपाशीवर औषध फवारणी करणेकामी गेले होते. नंतर त्यांना ते शेतात दिसले नाही. करिता त्याचा शेतात शोध घेतला असता औषध फवारणी करण्याचा फवारा हा विहिरीच्या कडेला पडलेला दिसला असता भावाने विहिरीत डोकावुन पाहीले तेव्हा माझे वडिल विहिरीच्या पाण्यात पडलेले दिसले.
तेव्हा ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढुन खाजगी वाहनाने कुटीर रुग्नालय पारोळा येथे उपचाराकरिता आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हिरालाल पाटील हे करीत आहेत.