जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून, अनुदान प्राप्त झाले असून तालुकास्तरावरुन या अनुदान वाटपाबाबतचे काम सुरु आहे.
शासनाच्या निर्देशानुसार ई केवायसी पोर्टल ५ नोव्हेंबर २०२५ पासुन सुरु झाले असून ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.









