जळगाव तालुक्यातील कानळदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कानळदा गावात रस्त्यामध्ये पडलेले बांधकामाचे साहित्य बाजूला करण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एका तरुण शेतकऱ्याला गावातील दोन जणांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कुंदन अरुण राणे (वय-३६, रा. कानळदा ता. जळगाव) हा तरुण शेती करून उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी दि. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडलेले होते. ते साहित्य बाजूला करा असे सांगितल्याच्या कारणावरून गावात राहणारे रवींद्र सुरेश शिंदे आणि राहुल सुरेश शिंदे यांनी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. दरम्यान, या घटनेबाबत कुंदन राणे यांनी जळगाव तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी रवींद्र सुरेश शिंदे आणि राहुल सुरेश शिंदे या दोघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल धनराज पाटील करत आहे.