पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील म्हसवे येथील ५१ वर्षीय शेतकऱ्याने गावातीलच शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १३ रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निंबा वामन न्हावी (सोनवणे, वय-५१ वर्ष रा. म्हसवे ता. पारोळा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावात परिवारासह राहत होते. निंबा न्हावी यांनी दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास योगेश चौधरी यांचे शेतात निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला. त्यांना ग्रामस्थांनी खाली उतरवुन कुटीर रुग्णालय पारोळा येथे आणले. त्यांना डॉक्टरांनी ०९.०० वाजेच्या सुमारास मयत घोषीत केले आहे. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्सटेबल डॉ. शरद पाटील हे करीत आहे.