सोयगाव तालुक्यात आमखेड्यातील घटना
सोयगाव (प्रतिनिधी) : सोयगावच्या आमखेडा भागातील शेतकऱ्याने बुधवरी रात्री १ वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. कर्जाचा बोजा डोक्यावर असताना उत्पन्न हाती आले नसल्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. सोयगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

गोपीनाथ वाळुबा मोरे (वय ४२) असे मयत कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी,दोन मूल, एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे. त्याच्याकडे फर्दापूर शिवारात गट क्र-१९० ला ३ एकर शेती आहे. खरीप हंगाम हातातून गेल्या नंतर रब्बीच्या हंगामात ही उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्जाचा बोजा फेडण्याच्या चिंतेत त्यांनी बुधवारी रात्री शेतातील विहिरीत उडी घेतली. त्यांचेकडे बँकांचे अंदाजे कर्ज, थकबाकी आहे. उत्पन्नच हाती न आल्याने त्यांनी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे. सोयगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









