अमळनेर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून नवीन आणलेल्या काळया कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप करत या कायद्यांच्या विरोधात जिल्हा कॉंग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला.


आ. शिरीष चौधरी, जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, प्रा.हितेश पाटील, आ अनिल भाईदास पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा सुलोचना वाघ, मनोज पाटील, तालुका कौग्रेस सरचिटणिस संतोष पाटील, अध्यक्ष महेश पाटील, शहर अध्यक्ष तौशिफ तेली, सईद तेली, राजु शेख, पवन पाटील, मयुर पाटील, मुन्ना शर्मा, संदीप घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.







