जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून १५ मदत प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी १० मदत प्रस्तावांना मान्यता देण्यात आली असून पाच प्रस्ताव फेटाळण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीत मदत अनुदानासाठी सादर झालेल्या १० प्रस्तावात भागवत रघुनाथ पाटील (भोलाणे ता पारोळा), समाधान एकनाथ धनगर (कंडारी ता. जळगाव), रविंद्र रामदास डहाके (साळुंखे) (निमखेडी बुद्रूक ता मुक्ताईनगर), हर्षल रविंद्र नेहते (निंभोर बुद्रूक), जिवराम तुकाराम कोळी (भामलवाडी ता. रावेर), रविंद्र दशरथ महाजन (अडावद), दिलीप सदा शिरसाठ (अनवर्दे खुर्द ता. चोपडा), दिलीप पाटील (झाडी), अशोक बाबूराव न्हावी (प्रगणे डांगरी ता. अमळनेर), रणजितसिंग पदमसिंग परदेशी (बांबरुड प्र.ता भडगाव) या प्रस्तावांचा समावेश आहे.
तर ५ प्रस्ताव अपूर्णता कारणास्तव फेटाळण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समिती सदस्य आदी उपस्थित होते.