पारोळा तालुक्यातील भोंडन दिगर येथील घटना
पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोंडन दिगर येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दंगल शिवाजी पाटील (वय५५) यांनी त्यांच्यावर असलेल्या सोसायटीचे कर्ज व इतर हात उसनवारीचे कर्ज या कर्जबाजारीपणाला कंटाळून आज दि.१० रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. शेतकरी दंगल पाटील यांचे वडील मयत झाले असून शेती त्यांच्या आईच्या नावाने असल्याने ते घरचे करते पुरुष होते. त्यांनी सोसायटी व इतर हात ऊसनवारीचे कर्ज घेतल्यामुळे ते सतत नापिकीमुळे फेड होऊ शकत नसल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.