पारोळा (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान योजना सुरू असून त्यात संकरीत मका वाण उदय अनुदानावर उपलब्ध आहे. पॅकिंग ४ कि. मुळ किंमत ६०० रु. अनुदान ३०० रु शेतकऱ्यांने भरावयाची रक्कम ३०० रु. उडीद वाण टि ए यु १ पॅकिंग ५ कि. ,मुळ किंमत ७०० रु. अनुदान १२५ रु.त्यासाठी शेतकऱ्याने भरावयाची रक्कम ५७५ रु.सदर योजने साठी लागणारी कागदपत्रे – ७/१२ उतारा ,आधार कार्ड झेरॉक्स, मोबाईल नंबर परमिट इत्यादी संबंधित कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या कडे जमा करावेत. तरी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी केले आहे.