यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमुखी मागणी
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील अनेक शेतांत रस्ते नादुरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकाम करण्यास अडचण येत आहे. शेतातील महत्त्वाचे रस्ते दुरुस्त केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात वापर करण्यासाठी चांगलं होणार आहे. पावसाळ्यातच शेतीचे रस्ते पावसाच्या पाण्याने अत्यंत खराब होतात, चिखल असतो. त्या चिखलातून बैलजोडी, मजूर, शेतकरी पायदळ किंवा बैल जोडीने पेरणीसाठी जातात. त्यामुळे अत्यंत त्रास होतो. त्या त्रासापासून शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी, यासाठी महत्त्वाचे शेताचे रस्ते तयार करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतात केळी लावल्यानंतर केळी पावसाळ्यात काढताना ट्रक चिखलात फसण्याची शक्यता असते. जास्त दूर उभी केल्यामुळे मजुरांनाही चिखलातून पायदळ जाण्या- र्येण्याचा त्रास होतो. यासाठी याकडे आमदार, खासदारांनी लक्ष देऊन महत्त्वाचे शेत तयार असते. दुरुस्त करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यांनाही दिलासा मिळेल. टप्प्याटप्प्याने शेताचे महत्त्वाचे रस्ते दुरुस्त केल्यास अत्यंत सोयीचा होईल, याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या सोडवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आधी शेतीला भाव नसल्यामुळे व मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यात पावसाळ्यातील रस्त्यामुळे फारच अडचणी निर्माण होत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.