भडगाव तालुक्यातील कोठली येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोठली येथील तरुणाचा शेत शिवारात काम करीत असताना सर्पदंशाने दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना आज दि. १ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हाती आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र पाटील (वय ४५, रा. कोठली ता. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचे पश्चात आई-वडील, बहिण, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. शेतीकाम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)गुरुवारी दि. १ मे रोजी तो सकाळी शेतात कामासाठी गेला होता. त्यावेळी त्याला सर्पदंश झाला. कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करत आली आहे . या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत. या घटनेमुळे कोठली परिसरात शोककळा पसरली आहे.