पारोळा पोलीस स्टेशनची धडक कारवाई
पारोळा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील आंबापिंपरी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या गांजाची शेती केल्याने त्या ठिकाणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व पारोळा पोलिसांनी कारवाई करून सुमारे १२० किलो ११९ ग्राम म्हणजेच १२ लाख १ हजार १९० रुपये किमतीची गांजाची ओली ताजी झाडे जप्त केली आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण मांडोळे, संदीप पाटील, राहुल कोळी, भगवान पाटील, विलास गायकवाड, सुनील हाटकर, बापू पारधी, संदीप सातपुते, प्रकाश गवळी, महेश पाटील, किशोर भोई यांनी केली.
याबाबत दि.५ रोजी संशयित आरोपी अरुण दोधु कोळी (रा. आंबापिंप्री ता. पारोळा) याने आंबापिंप्री शिवारात त्याचे शेत गट ३०६ चें बांधावर अंदाजे १२,०१,१९० रु किंमतीचे एकुण १२० किलो ११९ ग्रॅम वजनाचे ओले हिरवे गांजाच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड केली. म्हणुन अरुण दोधु कोळी याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल राहूल कोळी यांनी फिर्याद दिली आहे. सदर अरुण कोळी हा फरार असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहे.