यावल तालुक्यातील वाघोदे येथील घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वाघोदे येथील शेत शिवारातून राज्य विद्युत कंपनीच्या तार चोरी करून लांबवण्यात आले. ३०० मीटर लांबीचे ८ हजार रुपये किंमतीचे तार चोरी केल्याप्रकरणी बुधवारी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाघोदे, ता.यावल येथील दिलीप प्रभाकर बडगुजर यांच्या शेत गट क्रमांक २१३४ मध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे खांब आहेत. येथील तीन खांबावरील ३०० मीटर लांबीचे ८ हजार रुपये किंमतीचे तार कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ नबाब तडवी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोहसीन खान करीत आहे.