राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले धान्य आपल्या तालुकयातील केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विकीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी केले आहे. मंगळवारी दि. ६ ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहीती दिली. जिल्ह्यासाठी ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट होते. त्यापैकी ८४ हजार ११२ क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे. याकरिता आता ३१ ऑगस्टपर्यंत ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हयात ज्वारी खरेदीसाठी १८ केंद्र कार्यरत आहेत. जिल्हयात एकुण ५ हजार ३२७ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. दिनांक ३१ जुलै २०२४ अखेर २ हजार ४१५ शेतकऱ्याकडुन ८४ हजार ११२ क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे. ज्वारी खरेदीसाठी जिल्हयाकरीता एकुण ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट प्राप्त झाले होते. राज्य शासन, केंद्र शासनाकडील पाठपुराव्यामुळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने जिल्ह्याला ज्वारी खरेदीचे वाढीव उद्दिष्ट मिळाले आहे.
ज्वारी खरेदीसाठी प्रथम उद्दिष्ट ३० हजार, द्वितीय उद्दिष्ट ६५ हजार तर तृतीय उद्दिष्ट ९५ हजार मिळाले आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले धान्य आपल्या तालुकयातील केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विकीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी केले आहे.