ओळख पटवण्याची पोलिसांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका अनोळखी व्यक्तीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी ११ रोजी घडली. जिल्हापेठ पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
मयत व्यक्तीचे नाव अंदाजे ४५ असून अधिष्ठाता कार्यालयासमोर असलेल्या मंदिराजवळ तो पाणी पिण्यासाठी आला होता. तेथे तो चक्कर येऊन कोसळला. तत्काळ सुरक्षारक्षक, रुग्णालय कर्मचारी यांना दिसून येताच त्यांनी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदन गृहात रवाना करण्यात आला आहे. मयत हा भिकारी असावा असा अंदाज आहे. दरम्यान, जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. मयताची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसानी केले आहे.