मुंबई ( प्रतिनिधी ) – शिवसेना (शिंदे गट) प्रवर्तित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीची घोषणा मुंबई येथील शिवसेना मुख्यालयात करण्यात आली असून, रामकृष्ण परशुराम काटोले यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि कामगार सेनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, श्रमिक कामगार सेनेचे प्रदेश सचिव अमितजी भटनाकर , जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच श्रमिक कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी जबाबदारी रामकृष्ण काटोले यांना देण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत विश्वास व्यक्त केला असून, आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या नव्या जिल्हा कार्यकारिणीत रामकृष्ण काटोले यांच्यासह साधन विश्वास पाटील, अंजली सुहास घुबड, प्रतिभा कैलास ससाने, अॅड. अनिल देवीदास नवचरे, नंदकिशोर यादवराव देशमुख, लक्ष्मण महादेव पोळ आणि घनश्याम सोपान सपकळे यांचा समावेश आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे प्रदेश सचिव अमित आर. भटनागर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या निवडीनंतर जिल्हाभरातून रामकृष्ण काटोले यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. “कामगारांच्या हक्कांसाठी आणि पक्षाच्या विचारधारेसाठी निष्ठेने काम करत राहीन,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटनेच्या वरिष्ठांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, जळगाव जिल्हा संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.









