राज्यातील शाळा सोमवारपासून सुरु होणार – वर्ष गायकवाड
मुंबई (वृत्तसंस्था ) – महाराष्ट्रातल्या शाळा सुरु करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत होती. यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच पत्रकारांना माहिती दिली.
त्या म्हणाल्या, ‘ शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक स्तरावर अधिकार द्यावेत, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवली होती. शाळा सोमवारी येत्या 24 तारखेला सुरु कराव्यात अशी विनंती केली होती. ती विनंती त्यांनी मान्य केली आहे. त्यामुळे पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून शाळा उघडण्यासंदर्भातील निर्णय घेतले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.