जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांना एकतर्फी काँग्रेसमधून निलंबित केले. ही कृती काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी आवडली नाही. याचा निषेध म्हणून जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शैलेश राणे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रा प्रकाश सोनवणे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविला आहे.
नेते डॉ उल्हास पाटील यांचे काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी व संघटना टिकवण्यामध्ये मोठे योगदान असताना त्यांच्या कार्याकडे काँग्रेसने पाठ फिरवून त्यांना सहा वर्ष पक्षातून निलंबित केले. आमच्या नेत्यावर अन्याय झालेला असून जळगाव जिल्ह्यात अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना ही बाब खटकली आहे. हळूहळू अनेक पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे देतील. माजी खासदार डॉ उल्हास पाटील जी राजकीय भूमिका घेतील त्याला माझे वैयक्तिक समर्थन असेल. असा राजीनामा प्रदेश काँग्रेस समितीकडे प्रा शैलेश राणे यांनी पाठविला आहे.