जळगाव ( प्रतिनिधी ) — सागर पार्क समोरच्या शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त रंजना ठवरे यांची दुचाकी काल अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गणेश कॉलोनीतील कार्यालयासमोरून चोरून नेली
सहाय्यक धर्मादाय आयुक्त रंजना ठवरे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या फिर्यादीत म्हटले आहे की , एम एच ४० – एन ७०७३ क्रमांकाची टी व्ही एस ज्युपिटर दुचाकी त्या घरून कार्यालयात आणि कार्यालयातून घरी जाण्यासाठी वापरतात काल सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेदरम्यान ही ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला गेली.