नवी दिल्ली ;- सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. सीबीएसईचा बारावीचा निकाल तुम्ही https://cbseresults.nic.in वर पाहू शकता. यंदाचा सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला आहे. तसेच यामध्ये ९२.१५ टक्के विद्यार्थिनी तर ८६.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.