चाळीसगाव तालुक्यात सायगाव येथे चोरटा सीसीटीव्हीत कैद
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील सायगाव येथे एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी झाल्याचे समोर आले आहे. यात सेतू कक्षातील ३ लाखांचा मुद्देमाल तर अन्य ठिकाणी १ दुचाकी चोरीला गेली आहे. याप्रकरणी चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मन्याड पुलाजवळ हिरालाल रोकडे यांच्या सेतू कक्षातील रोख रक्कम, लॅपटॉप, प्रिंटर, दोन मोबाईल चार्जर आणि इतर ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना गुरुवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मन्याड पुलाजवळीलच मल्हारी सतोबा काळे यांच्या घराजवळ त्यांच्या मालकीची दुचाकी चोरीला गेली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे करत आहेत.