जळगाव ( प्रतिनिधी ) ;– शिवसेनेच्या बळीराम पेठ शाखेतर्फे अमृतयोजने मुळे ठिक ठिकाणी चाऱ्या खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. रात्री बेरात्री खड्ड्यांमुळे अपघात होत असतातयाच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले . याबाबत शिवसेनेतर्फे ठेकेदाराला जाग यावी यासंदर्भात ठेकेदाराचा निषेध करत शिवसेनेच्या बळीराम पेठ शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे यांनी यावेळी या आंदोलनस्थळी देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. ठेकेदाराची कानउघडणी करून दोन दिवसात हे काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराला सांगितले असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले . या आंदोलना प्रसंगी शिवसेना विभाग प्रमुख विपीन पवार, उपविभाग प्रमुख जितेंद्र गवळी ,निर्भय पाटील ,उमेश तायडे ,गणेश गवळी, रुपेश पाटील, ललित भोळे, याप्रसंगी उपस्थिती होती.








