पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावाजवळ घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावाजवळील जमदाडे नाल्याजवळ भरधाव वेगात असलेल्या स्कूल बस व दुचाकीची जोरदार धडक दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास झाली आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वार इसम यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर पवार (वय ४६, रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) असे मयत इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)किशोर पवार हे मोटरसायकलवरून दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घरी जात होते. जमदाडे पुलाजवळ पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची स्कूल बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. किशोर पवार यांना तात्काळ पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे.