जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील द्रौपदिनगरातून एकाची १३ हजार रूपये किंमतीची चोरीस गेलेली सायकल जिल्हापेठ पोलीसांनी चोरट्याला पकडून जप्त केली आहे.३१ डिसेंबररोजी दुपारी पोलीसांनी फिर्यादीस सायकल परत केली
ॲड. योगेश महाजन यांची २० मार्च २०२१ रोजी त्यांच्या घरासमोरून मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने १३ हजार रूपये किंमतीची सायकल चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. योगेश महाजन यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी शोध सुरू केला होता. गुन्ह्यातील चोरीस गेलेली सायकल ही ईस्माईल अली राजीव अली ( रा. तांबापूरा ) यांच्याकडे मिळून आली. संशयितावर कारवाई करत चोरीचा सायकल हस्तगत केली. सायकलीचे मुळ कागदपत्र पाहून ३१ डिसेंबररोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पो नि रामदास वाकोडे यांच्या उपस्थितीत सायकल मुळ मालाकाला परत करण्यात आली आहे.