• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सव्वा पाच लाख ग्राहकांनी २१० कोटी ऑनलाईन वीजबिल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 9, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पावसाळ्यात दक्षता बाळगून वीज अपघात टाळा – इब्राहीम मुलाणी

जळगाव परिमंडलात महावितरणच्या योजनांना प्रतिसाद

 जळगाव (प्रतिनिधी) :- ग्राहक सुविधांसाठी महावितरणकडून सातत्याने नवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत यासाठी ऑनलाईन वीजबिल भरणा प्रक्रियेला गती देण्यात येते. महावितरणच्या या ऑनलाईन पध्दतीला जळगाव परिमंडलातूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर २०२४ या महिण्यात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलातून उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील ५ लाख २० हजार ४५९ वीज ग्राहकांनी २१० कोटी ७३ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

ऑनलाईन विजबिल भरणा पध्दतीमुळे ग्राहकांना रांगेत उभे राहून अधिकचा वेळ खर्ची घालवण्याची गरज नाही. ऑनलाईन वीजबिल भरणा केल्यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. शिवाय, वीज यंत्रणेवरील वसुलीसाठीचा अतिरिक्त ताणही कमी होणार आहे. ग्राहकांना वीज सेवेबाबतचे एसएमएस देण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणीही सुरु असून ग्रामीण भागातल्या वीज ग्राहकांची भाषेची सोय व्हावी म्हणून महावितरणतर्फ़े आता इंग्रजीसह मराठी भाषेतूनही एस एम एस सेवा सुरु आहे. जळगांव जिल्ह्यातून नोव्हेंबर महिन्यात ३ लाख ४५ हजार ग्राहकांनी १२७. ५६ कोटी रुपयांचा ऑनलाईन विजबिल भरणा केला.

धुळे जिल्ह्यातून १ लाख १९ हजार ३८३ ग्राहकांनी ६५. १३ कोटी तर नंदूरबार जिल्ह्यातून ५५ हजार ८७७ ग्राहकांनी १८ कोटी ४ लाख रुपयांचा ऑनलाईन भरणा केला. आपल्याकडे संगणकावर किंवा महावितरण मोबाईल ॲप व महापॉवरपेच्या मदतीने वीजबिल भरण्याची सोपी पध्दत उपलब्ध आहे. ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचावेत, रांगेत तिष्ठत उभे राहाण्याची गरज भासू नये म्हणून महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर जाऊन ग्राहकांना चालू वीजबिल भरण्याची सुविधा आहे. ऑनलाईन बिल भरल्यास संगणकीकृत पावती ग्राहकाला मिळते. महावितरणचे मोबाईल ऑनलाईन ॲप्लीकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ती सेवा चोवीस तास उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकाला आपले वीजबिल केव्हाही आणि कुठूनही भरता येते.

एस एम एस सेवेसाठी वीज ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ग्राहकांनी मराठी, मराठी भाषेसाठी टाईप करुन स्पेस देऊन आपला बारा अंकी वीजग्राहक क्रमांक टकून 9225592255 या क्रमांकावर  एस.एस.एस. करावा लागणार आहे. महावितरणच्या ग्राहकांना विविध सेवांची माहिती तसेच त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस व चोवीस तास टोल फ़्री सेवा उपलब्ध करुन दिली आहे. 1912 व 1800233435, 18001023432 या क्रमांकावर तक्रार नोंदविता येते. अधिकाधिक ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.


 

Tags: savva-pach-lakha-grahakani 210 koti online vijbil news
Previous Post

अपघातातील गंभीर जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

अरे बापरे, ३ वर्षीय मुलीवर १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरे बापरे, ३ वर्षीय मुलीवर १७ वर्षीय मुलाकडून लैंगिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon