जळगाव एलसीबीची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथून सुमारे ५ महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर चोरीची घटना उघड झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोलीस अंमलदार- जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते. नमुद पथकातील पोलीस अधिकारी यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रमेश उर्फ अनिल काशीनाथ सोनवणे (वय-३२ रा. सावखेडा बु।। भिलाटी ता.जि. जळगांव) याला ताब्यात घेतले. त्याने सुमारे ०४ ते ०५ महीन्यापुर्वी जळगांव तालुक्यातील सावखेडा बु।। गावातुन एक ट्रक्टर वाहन चोरी केल्याची गुप्त माहीती मिळाली.
त्यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करता त्याने जळगांव तालुका पो.स्टे.हद्दीतील हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयातील चोरीस गेलेले एमएच १९ ए.पी ५०७६ क्रं.चे वाहन ट्रक्टर सुमारे २,५०,०००/- रू, किं.चे त्याचे कडुन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणुन त्यास पुढील कारवाई कामी जळगाव तालुका पो. स्टे. ला हजर केले आहे.