‘मविआ’चे डॉ. ५६ हजार ३३२ मतांनी पराभूत
भुसावळ (विशेष प्रतिनिधी) :- येथील भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांचा चौथ्यांदा विजय झाला असून महाविकास आघाडीचे डॉ. राजेश मानवतकर यांचा ४७ हजार ४८८ हजारानी पराभव केला आहे. आता आ. संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर भुसावळकरांनी विश्वास ठेऊन सलग चौथ्यांदा त्यांना विधानसभेत पाठविले आहे.
आता सर्व २३ फेऱ्या संपलेल्या आहे. संजय सावकारे यांना २३ व्या फेरीअखेर १ लाख ७ हजार २५९ तर डॉ. राजेश मानवतकर यांना ५९ हजार ७७१ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष स्वाती कुणाल जंगले यांनी ९७६४ मते मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. भुसावळ तालुक्यातील विविध गावागावांत महायुतीकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे जगन्नाथ सोनवणे यांना ३७२० मते मिळाली आहे.