जळगाव (प्रतिनिधी):- तालुक्यातील शिरसोली येथिल सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय आणि आप्पासो जगतराव बारकू पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भव्य प्रभात फेरीने झाली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फेरी काढून ‘संविधान’ व ‘लोकशाही’ या मूल्यांविषयी जनजागृतीपर विविध घोषणा दिल्या. प्रभात फेरीनंतर शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध कला व ज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये:
चित्रकला स्पर्धा,गीतगायन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा अशा स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत संविधानाचे महत्त्व विशद केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक कार्यमंत्री सौ. सुरेखा ढाके मॅडम यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









