११ संघांचा सहभाग; केशव स्मृती- गोदावरी फाउंडेशनचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात यावल, रावेर तालुक्यातील शाळांच्या संघानी सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. एकापाठोपाठ एक अशा ११ संघांनी आपली कला विविध सामाजिक संदेश देऊन सादर केली.
महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ प्रियदर्शनी सरोदे, हेमांगी चौधरी, रेखा वानखेडे, माजी नगराध्यक्षा अनिता येवले, सिमरन वानखेडे, केशव स्मृतीच्या मनीषा खडके, साधना दामले, योगिता चौधरी, शाळेच्या प्राचार्य भारती महाजन, भाजपच्या नंदा लोखंडे, रेखा बोन्डे, सारिका चौहान, नंदिनी पंत, योगिता वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी सहभागी संघांसाठी शुभेच्छा पाठवून प्रोत्साहित केले.
प्रारंभी स्व.गोदावरी आई पाटील यांना अभिवादन करण्यात आले. भुलाबाईची आरती व दीपप्रज्वलन करून महोत्सवास सुरुवात झाली. यानंतर एकामागे एक असे ११ संघानी भुलाबाईच्या तसेच श्रावण महिन्यातील सणांवर आधारित गीतांच्या तालावर नृत्य सादर केले तसेच मोठ्या संघानी विविध सामाजिक संदेश दिले.
या स्पर्धेचे परीक्षण रितू रायसिंघानी, वैशाली गुरव, सचिन भिडे यांनी केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळांचे स्वागत केले तसेच पुढील वर्षीसुद्धा भुलाबाई महोत्सवात नव्या उत्साहाने सहभागी व्हा असे आवाहन केले. विजयी संघांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, टिफिन बॉक्स व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महोत्सवात सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र, खाऊचे पुडे व टिफिन बॉक्स भेट देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा तायडे यांनी केले. याप्रसंगी सावदा शहरातील सर्व आजी-माजी नगरसेविका, रसिक प्रेक्षक उपस्थित होते. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गोदावरी फौंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा ने परिश्रम घेतले.
——
निकाल
लहान गट – प्रथम शांती विद्यामंदिर विद्यामंदिर, फैजपूर, द्वितीय जि.प.मुलींची शाळा, वडगाव
मोठा गट – प्रथम भारत विद्यालय, न्हावी, द्वितीय मायक्रो व्हिजन, रावेर
खुला गट- प्रथम भारत विद्यालय न्हावी
..
उत्तेजनार्थ – सांदीपनी गुरुकुल, पाल