जळगाव ( प्रतिनिधी ) – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ सावदा येथील दोन मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.
राजेंद्र भादू डोळे ( वय ४२; पाटीलपुरा सावदा, ) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय ५३ रा सावदा) हे दोन्ही जण मोटारसायकलवरून जळगावकडे कामानिमित्त येत होते. रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हे दोन्ही जण जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला नशिराबाद पोलीस स्थानकात अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.