सावदा – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल सावदा येथे गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर वर्षा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथसंचालनाद्वारे डॉ. वर्षा पाटील यांच्या समवेत सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली . त्यानंतर विद्यार्थ्यांनी काही नृत्य, पथनाट्य,सामूहिक कवायत सादर केली. कलाशिक्षक उमेश बढे यांनी लढाऊ विमान निलेश राणा यांनी काढलेल्या भारत मातेच्या रांगोळीने कार्यक्रमाची शोभा वाढली .स्काऊट गाईडचे विद्यार्थी देखील त्या सहभागी झाले होते.विविध देशभक्तीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी समाजातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आणि अतिशय आनंदी वातावरणात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.