नगरपालिकेसह पोलीस स्टेशनमध्ये कार्यक्रम
सावदा (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सावदा येथे नगरपालिकेत अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी, दि. ३० एप्रिल रोजी लिंगायत समाजाचे थोर संत महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या दोन्ही महान संतांनी समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला, ज्याची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देते. सावदा नगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या नेतृत्वाखाली संतांच्या प्रतिमांचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी, लेखापाल विशाल पाटील, सतीश पाटील, किरण चौधरी, हमीद तडवी, ग्रंथपाल राजू साळी यांच्यासह लिंगायत समाजातील विकास बावणे, कैलास लवंगडे, सुनील उमराणे, सतीश नारळे, सागर कोष्टी, संजय बन्नापुरे, प्रशांत सरवदे, संजय पवार, दिपक श्रावगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस स्टेशनमध्येही पूजन
सावदा पोलीस स्टेशन येथेही महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संतांच्या विचारांचे महत्त्व आणि त्यांचा समाजातील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी संतांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या समतेच्या तत्त्वांना आचरणात आणण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाने सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.