सावदा ( प्रतिनिधी ) – शहरातील विस्तारित वसाहतीमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुरी मिळालेल्या रस्त्यांच्या खडीकरणाच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला

सावदा येथील पालिका हद्दित नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील सोमेश्वरनगर व परिसरात अनेक दिवसापासून रस्ते, गटारी, पथदिवे आदी समस्या होत्या आ. चंद्रकांत पाटील यांनी सावदा येथे घेतलेल्या आढावा बैठकीत या समस्या लोकांनी मांडल्या होत्या त्यावेळी आ. पाटील यांनी लवकरच आपण या समस्या सोडऊ असे आश्वासन दिले होते, त्यानुसार या भागातील रस्त्याच्या खडीकरणासाठी निधी त्यांनी मंजुर करुन दिला काल प्रत्यक्षात कामास सुरवात झाली
या कामाचे शुभारंभाप्रसंगी नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, माजी नगरसेवक फिरोज खान , शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी, भरत नेहेते, गौरव भैरवा, मनीष भंगाळे, शाम पाटील, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी शहराध्यक्षा सौ, कल्पना ठोसरे यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते,
नागरिकांचे हस्तेच कूदळ मारून कामास सुरवात करण्यात आली, या कामाची सुरवात झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी परिसरातील दिपक भारंबे, मधुकर पाटील, दिपक चौधरी, सचिन बढे, तुषार बढे, निखिल महाजन, सुवर्णा भारंबे, कल्पना ठोसरे, पुष्पा साळी, विभावरी बेंडाळे, रुपाली चौधरी, वंदना महाजन, प्रतीक लोखंडे, सोनू लोखंडे, विकास भोई, हरी फेगडे, नालिनी महाजन, वर्षा जैन आदी उपस्थित होते.







