अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत उपक्रम
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत रावेर तालुक्यातील सावदा रेल्वे स्टेशनचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते व्हिडीओद्वारे उद्घाटन करण्यात आले. नंतर केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेरचे खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते शालेय मुलांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींचे निरीक्षण करून त्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
शालेय विदयार्थीनी देशभक्तीपर गीते सादर केली. जळगाव जिल्ह्यात पाच स्टेशनला मान्यता देण्यात आली आहे. जळगावचे जिल्हाधीकारी यांनी सांगितले की, जळगाव जिल्हा हा केळीचा जिल्हा आहे. इतर राज्यात रेल्वेद्वारे केळी पाठवण्यास मदत होईल. भुसावळ विभागाचे डिआरएम ईती पांडे यांनी सांगितले की, एकुण १६ रेल्वे स्टेशन घेतले जाणार आहे . पुढील वर्षी यातील काही स्टेशन घेतले जाणार आहे. रावेरचे आ. अमोल जावळे यांनी सांगितले की, केळी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने रासायनिक खतांचा पुरवठा रेल्वेद्वारे होत असतो. शेतकऱ्यांना पुरवठा सुरळीत करण्यासाठी याची मदत होईल. यावेळी अनेक उच्च अधिकारी व मान्यवरांनी हजेरी दिली होती.