सावदा ;- येथे प्रहार जनशक्ती पक्ष रावेर तालुका यांच्याहस्ते डॉक्टर डे दिवस साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदु पाटील आपल्या देशातील कोरोणामाहामारीचया काळात सर्व डॉ यांचे खुप मोलाचं योगदान दिले . स्वताच्या जिवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र एक करून मदतीला धावून आले म्हणून त्या निमित्ताने आज त्यांचे स्वागत केले. त्या सावदा येथील डॉ चेतन फेगडे, डॉ शेखर पाटील, डॉ जितेंद्र पाटील, डॉ अन्सार खान, डॉ वसीम खान, हे उपस्थित होते. तसेच प्रहार जनशक्ती पक्ष रावेर तालुका अध्यक्ष दुर्गादास धांडे विजय पाटील प्रमोद वाघुळदे अहमद तडवी शगीर तडवी गुडा तडवी इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदु पाटील सर यांनी केले व सर्वांचे आभार मानले.