मुंबई ( वृत्तसंस्था ) – सावंतवाडी शहरातील भरवस्तीत वृद्ध महिला आणि तिचा सांभाळ करणाऱ्या दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. या महिलेच्या अंगावरील दागिने लंपास झाले मात्र खुनाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.
महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने दुहेरी हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खून झालेल्या महिलेचे नाव नीलिमा खानोलकर होते. त्याच्यासोबतच्या केअरटेकर श्यामली शांताराम सावंत यांचीसुद्धा हत्या करण्यात आली. राजू मसुरकर यांच्या नजरेत ही घटना आली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. सावंतवाडी शहरातील उभा बाजार भागात ही घटना घडली .