आ. एकनाथराव खडसेंची माहिती
कैलास कोळी
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : आपण केळी विकास महामंडळाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले नंतर त्यासाठी सतत पाठपुरावा केला परंतु शेतकऱ्यांप्रति असलेल्या अनास्थेमुळे घोषणा आणि निधी जाहीर करून सुद्धा सत्ताधाऱ्यांनी केळी विकास महामंडळ स्थापन केले नाही. महामंडळ व आपले इतर प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीचा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवा असे एकनाथराव खडसे यांनी उपस्थितांना आवाहन केले
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गाव भेट संवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड, मेंढोदे खडकाचे, उचंदे, शेमळदे, मेंढोळदे, पंचाणे, मेळसांगवे या गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थां सोबत संवाद साधला. ग्रामस्थांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊन आपल्या पक्षाचे विकास कामे, ध्येय धोरणे विषद केले. यावेळी माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब, जेष्ठ नेते रविंद्र पाटिल, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ग्रामस्थां सोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या आ.एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून आपल्या परिसरात मुलभूत सुविधांची अनेक कामे झाली. भविष्यात सुद्धा ग्रामस्थांच्या मागणी नुसार कामे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या परिसरातील ग्रामस्थ स्व.प्रल्हाद भाऊ पाटिल, स्व.पंढरीभाऊ पाटिल, स्व.शामरावजी तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या विचारांचे पाईक राहिले असुन नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे.
यावेळी रविंद्र पाटिल यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या परिसराने नेहमी शरद पवार यांच्या पुरोगामी, विकासाभिमुख विचारांची कास धरून प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला कायम मताधिक्य दिले आहे या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीला मताधिक्य देऊन जनहिताचे निर्णय घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत आपले योगदान देण्याचे रविंद्र पाटिल म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,तालुका अध्यक्ष यु डी पाटिल सर,बाजार समिती सभापती सुधिर तराळ, माजी सभापती निवृत्ती पाटिल, सुधाकर पाटिल, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटिल, लक्ष्मणराव भालेराव, भागवतराव पाटिल, निलेश पाटिल, संदिप देशमुख, युवराज पाटिल, जितेंद्र पाटिल, बाळू पाटिल, सुनिल पाटिल, मस्तान कुरेशी, बापु ससाणे, नंदकिशोर हिरोळे,रऊफ खान , शाहिद खान, विनोद काटे,राहुल पाटिल,निलेश भालेराव, साहेबराव पाटिल, माणिक पाटिल, रतीराम पाटिल, शांताराम धनगर,राजेंद्र भोलाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.