जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील ४ ठिकाणांवर पोलिसांनी सलग धाडी टाकून जुगार आणि सट्टा चालवणारे आणि खेळणारे जवळपास १० आरोपी पकडले आहेत . पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत
शहरातील सिंधी कॉलनी, शनीपेठ परिसर, रिधूर वाडा आणि शिरसोली जकात नाक्याजवळील शेतात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आज दुपारी धडक कारवाई करत सट्टा व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली पोलिसांनी ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतनदास मेहता हॉस्पीटलच्या बाजूला एका दुकानावर, शनीपेठ परिसरात दोन ठिकाणी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली रोडवील जकात नाक्याजवळील शेतात अशा चार ठिकाणी सट्टा व जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली होती. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे स्वत: कारवाईसाठी मैदानात उतरले होते. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी यांनी सलग चार ठिकाणी धडक कारवाई करत ८ ते १० जणांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून रोकड, सट्टा व जुगार खेळण्याचे साहित्य आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत संबंधित पोलीस ठाण्यात संशयित आरोपींवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.