चोपडा (प्रतिनिधी)– तालुक्यात आज पोलिसांनी राजस्थानातून येत असलेल्या वाहनातून १४ तलवारी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे . गुप्त माहिती मिळताच या कारवाईसाठी पो ना राकेश पाटील यांनी दाखवलेल्या तत्परतेने सर्वत्र कौतुक होत आहे .
चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पो ना राकेश पाटील यांना सत्रासेन गावापासून दोन किमीवर वन विभागाच्या चेकपोस्टजवळ मारोती व्हॅन ( क्रमांक एम एच १९ सीएफ ४५७१ ) मधून काही लोक राजस्थानातील पुष्कर येथून चौदा तलवारी घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
यावरून दुपारी पो ना राकेश पाटील यांनी ही मारूती ओमनी गाडी थांबवून तपासणी केली त्यांना गाडीत १४ तलवारी मिळून आल्या या गाडीत पाच इसम होते यापैकी एक आरोपी मुशरीफ खान ( रा.भडगाव ) हा लघुशंकेच्या बहाण्याने थोड्या अंतरावर जाऊन पसार होण्यात यशस्वी झाला
या तलवारीची किंमत ९८ हजार रुपये, ओमनीची किंमत २ लाख रुपये ,चार मोबाईलची किंमत – ५० हजार रुपये असे एकूण ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल या आरोपींकडून जप्त करण्यात आला. मुस्ताकीन खान मेहबूब खान ( रा.आस्थानगर,चाळीसगाव) , आरिफ इब्राहिम पिंजारी ( घाटरोड, चाळीसगाव ) , हरीम खान जमिल खान ( घाटरोड, चाळीसगाव ) , सलमान खान अय्यूब खान ( इस्लामपुरा, चाळीसगाव ) यांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील चौकशी डीवायएसपी ऋषीकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्यातील पो नि देविदास कुनगर यांच्या नेतृत्वाखाली हे. कॉ.शिंगाणे करत आहेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. मध्यप्रदेशातून अनेक वस्तूची महाराष्ट्रात तस्करी होत असते.