जळगाव ( प्रतिनिधी ) – एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या पथकांनी काल रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राबवलेल्या ‘ ऑल आउट ‘ मोहिमेत १७ आरोपींना पकडण्यात आले .
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह ५ पोलीस उपनिरीक्षक आणि २६ पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते . १३ अजामीनपात्र आणि ३ जामीनपात्र वॉरंटसची तामिल या मोहिमेत करण्यात आली . २ सर्च वारंट बजावण्यात आले . १४ हिस्ट्री शिटर्सची तपासणी केल्यावर त्यापैकी ११ सापडले . तपासात पाहिजे असलेले २ आरोपी पकडले गेले . अन्य १ फरार असलेला आरोपीही हाती लागला.