पाचोरा ( प्रतिनिधी ) – डेंग्यू व चिकन गुनियाचे रुग्ण आढळून आलेल्या सार्वे-जामने गावात आमदार गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
तालुक्यातील सार्वे-जामने गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व चिकन गुनियाचे रुग्ण आढळून आले या गावाकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असा आरोप माजी सरपंच संजय पाटील यांनी केला होता त्यांनी पुढाकार घेऊन आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून रुग्णाची मोफत आरोग्य व रक्त तपासणी करून रुग्णांना औषधी मोफत देण्यात आली 250 रुग्णाची रक्त तपासणी तसेच 300 रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प सदस्य शांताराम पाटील , ग्रा प सदस्य संजय पाटील , डॉ. महेंद्र चव्हाण , डॉ. मयुरी पवार , डॉ. योगेश डाखणे, जी. एम.फौंडेशनचे आरोग्यदूत पितांबर भावसार , अनिल सोनवणे उपस्थित होते शिबीर यशस्वीतेसाठी ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल व सार्वे-जामनेच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले.