कोल्हापूर (वृत्तसंस्था ) – घरामध्ये आई आणि मुलगी गाढ झोपेत असताना विषारी नागाने घरात प्रवेश करून मायलेकींना दंश केल्याने मुलीचा मृत्यू झाला असून आईची प्रकृती गंभीर असल्याची घटना जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील भामटे गावात उघडकीस आली असून परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
ज्ञानेश्वरी यादव असे मृत मुलीचे नाव असून आई नीलम यादव यांची ही प्रकृती चिंताजनक आहे. या घडलेल्या घटनेत शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्प घरांमध्ये शिरून साप चावल्याच्या घटना घडत आहे . नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.