अमळनेर ( प्रतिनिधी ) – शिरूड येथील घराच्या अंगणात बांधलेल्या बैलाला गुरुवारी सायंकाळी सर्पदंश झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

शिरूड येथील भैय्या पाटील यांच्या अंगणात त्यांचा बैल बांधलेला होता.परंतु, सायंकाळी बैल अचानक जागेवर पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता बैल निपचित पडलेला दिसला. त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याने कोणत्यातरी विषारी जातीच्या सर्पाने त्यास दंश केला असल्याने बैल जागीच गतप्राण झाला होता. काही दिवसापूर्वी भैय्या पाटील यांच्या घराच्या अंगणात बांधलेली बैलजोडीमधील एक बैल रात्री चोरांनी सोडून नेला होता. त्याच जोडीमधील एका बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने ऐन शेतीच्या कामांची लगबग असतांना बैलाची जोडी गमविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.







