पाचोरा तालुक्यातील वेरुळी बुद्रुक येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वेरूळी बुद्रुक येथील रहिवासी शेतकऱ्याचा स्वतःच्या मालकीच्या शेतात काम करत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. २६ रोजी घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पितांबर त्र्यंबक पाटील (वय ५८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पितांबर पाटील यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित तीन मुली असा परिवार आहे.(केसीएन)वेरुळी गावात शेतात काम करीत असताना त्यांना अचानक काहीतरी चावल्यासारखे जाणवल्याने तात्काळ ते घरी आले. त्यांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापुर्वीच पितांबर पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत शांत व कष्टकरी पितांबर पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने वेरूळीसह परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.