पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : अंगणात खेळत असताना ७ वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी नगरदेवळा दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
मृत चिमुकलीचे नाव काव्या राहुल मणियार (७) असे आहे. ती पहिलीत शिकत होती. बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर अंगणात भावंडांसोबत खेळत होती. दरम्यान, अचानक तिला सर्पदंश झाल्याने तिला नातेवाइकांनी तातडीने भडगाव येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मयत घोषित केले. या घटनेने मणियार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.