• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यू ; जिल्हा प्रशासनाची माहिती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2023
in Uncategorized
0
विषारी सापाच्या दंशाने मुलगा दगावला ; हतबल बापाचा भिंतीवर डोके आपटत आक्रोश

अंधश्रध्दा बाळगू नका, सर्पदंशावर वेळीच घ्या वैद्यकीय उपचार !

 जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात २३ जणांचा मृत्यु झाला आहे. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था सर्प, मानव आणि पर्यावरण या विषयावर शून्य सर्पदंश अभियान राबवित आहे. यातून जनजागृती, सर्पदंश,  प्रथमोपचार, आणि अंधश्रध्दा निर्मूलन यावर कार्य करत आहेत. तर संस्थेचे सर्पमित्र वनविभागाच्या मार्गदर्शनात सर्प रेस्क्युचे काम करत असतात. आतापर्यंत सर्पदंश झाल्यावर सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. दंश झाल्यावर असे उपचार तात्काळ शक्य होतात असे नाही. अशावेळी डॉक्टरांकडे  जाईपर्यंत प्रथमोचार जीवनावश्यक असतात.  पावसाळा सुरू झाला की शेतकरी शेतीची कामे करायला लागतात, अडगळीत पडलेल्या वस्तू बाहेर काढल्या जातात, जनावरांचे गोठे साफ होतात. जळाऊ सरपण काढले जाते, शेती मशागतीच्या कामांना वेग येतो हाच काळ असा आहे. ज्यात सापांचा वावर वाढतांना दिसून येतो अनेक नागरिक  सापांना मारतात तर काही नागरिक साप वाचवण्यासाठी प्रयत्न करतात अश्यावेळी सापाचा आणि नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्र मोलाची भूमिका बजावतात.

साप घरात येऊ नये म्हणून परिसर स्वच्छ ठेवा, अडगळ काढून टाका, अनावश्यक झुडुपे वेली काढून टाका किंवा छाटणी करा, उष्टी खरकटी परिसरात टाकू नका. त्या मुळे परिसरात उंदीर येणार नाही. ड्रेनेज पाईपच्या गटाराकडील बाजूला जाळी बसवा. जेणेकरून त्या द्वारे साप घरात येणार नाही. खळ्यात ,गोठ्यात, शेतात वावरतांना लांब काठी बाळगा , कडबा ,चाऱ्यात एकदम हात घालू नका गोवऱ्या , लाकडे काढताना सावधानता बाळगा. अंगण, घरातील बिळे दरवाज्यांच्या चौकटीतील फटी व्यवस्थित बुजवून टाका. मण्यारसारखे विषारी साप निशाचर आहेत. त्यामुळे रात्री जमिनीवर झोपणे टाळा, रात्री बाहेर जातांना , शेतात वावरताना, हातात टॉर्च पायात बूट घालायला विसरू नका.

सर्पदंश झाल्यास घाबरून जाऊ नये, सर्वप्रथम वैद्यकीय उपचार लवकरात लवकर कसा मिळेल त्या साठी प्रयत्न करावे. रुग्णास धीर द्यावा त्याला जास्त हालचाल करू देऊ नये. जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. सर्पदंश झालेल्या भागाच्या वरच्या बाजूला आवळ पट्टी बांधून दर ५ ते १० मिनिटांनी ती सैलं करून परत बांधावी. चिरा देऊ नये, सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये. कोणताही सर्प असो जर त्याचा दंश झाला तर तत्काळ सिव्हील हॉस्पिटल किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल झाले पाहिजे.

सर्पदंशाच्या अंधश्रध्दांवर विश्वास ठेवू नये. साप कधीही तुम्हाला स्वतःहून पूढे येऊन चावत नाही , साप डूख धरत नाही, सापाला आपल्या सारखी तीक्ष्ण दृष्टी नसते, त्याला हात ,पाय, बाह्यकान देखील नसतात कुणाचा चेहरा लक्षात राहील इतका त्याचा मेंदू तल्लख नाही म्हणून कोणताच साप बदला घेत नाही. साप चावला म्हणजे मृत्यू नाही प्रत्येक साप विषारी नसतो आणि विषारी सर्पदंश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण १००% वाचतो.

सर्पमित्रांनी साप वाचवल्यावर उपस्थित जनसमुदायास सर्प अंधश्रद्धाबद्दल जागृत करून वैद्यकीय उपचाराचे महत्त्व समजावून त्या बाबत मार्गदर्शन करावे. सोशल मीडियावर प्रसिध्दीसाठी सापासोबत स्टंट किंवा फोटो सेशन व्हिडिओ बनवू नये. घरात सर्प संग्रह करू नये. जनजागृती करतांना जीवंत सापांचे प्रदर्शन करू नये . नागरिक स्वतःचा आणि सापाचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्रांना कॉल करतात. अशावेळी पेट्रोल चार्जच्या नावाखाली अवास्तव रक्कम मागू नका. सर्प वाचवणे आपले कर्तव्य आहे. पण रिकामे धाडस करू नये. स्वतःचा जीव वाचवणार तरच सर्प वाचवता येतील असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/sarpdandahane-char-mahinyat/
Previous Post

पती कामावरून घरी आला अन् पत्नीचा मृतदेहच दिसला  

Next Post

शेतात काम करीत असताना वीज ,पडली, दोन महिला मृत्युमुखी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतात काम करीत असताना वीज ,पडली, दोन महिला मृत्युमुखी

शेतात काम करीत असताना वीज ,पडली, दोन महिला मृत्युमुखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon