जिल्ह्यातील तिघांवर जळगावात गुन्हे दाखल
शांताराम महादू पाटील (वय ५३, रा. मुंदखेडे बु., ता. चाळीसगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी जळगाव रेल्वे स्टेशनकडून सार्वजनिक रस्त्यावर ही रक्कम संबधित संशयित आरोपींना देण्यात आली. यावेळी बाळासाहेब ऊर्फ ज्ञानेश्वर हरचंद पाटील (रा. उत्रान, ता. एरंडोल), भिवसन महाले (रा. मेहुटे, ता. पारोळा) आणि खंडू बापू महाले (रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) या तीन संशयितांनी संगनमत केले. त्यांनी फिर्यादीच्या मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देत, शांताराम पाटील यांच्याकडून २ लाख रुपये घेतले आणि त्यांची फसवणूक केली. फसवणुकीनंतर शांताराम पाटील यांनी हे पैसे परत मिळावेत, यासाठीची मागणी केली असता, खंडू महाले याने शांताराम पाटील यांना फोनद्वारे शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या फसवणुकीप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये सोमवार, २९ सप्टेंबर रोजी तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.