रावेर पोलीस स्टेशनची कामगिरी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यात दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहे.
रावेर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस गस्तीवर असताना सायला मानसिंग बारेला (वय-१८ वर्ष रा.खा-या काकोडा, ता.झिरण्या, जि.खरगोन मध्यप्रदेश, ह.मु.गिटटी खदान, उटखेडा रोड, ता.रावेर) याने चोरीची दुचाकी आणली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. पथकाने सापळा रचत त्यास थांबवून चौकशी केली. त्यानी समाधानकारक उत्तर दिले नाही.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ती दुचाकी त्याने रावेर येथून आठवडे बाजार पटयातील नगर पालिकेच्या शौचालयाचे गल्लीतून चोरुन आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी आणखी चौकशी आणि तपास केला असता रावेर पोलीस ठाणे हद्दीतील आणखी एक चोरीची दुचाकी काढून दिली आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक किशोर सपकाळे, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल, महेश मोगरे, अमोल जाधव, विकार शेख, तथागत सपकाळे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.