• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

संपत्तीसाठी सख्या भावावर हल्ला करणाऱ्या भावासह दोन मित्रांना जन्मठेपची शिक्षा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2023
in Uncategorized
0

 पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे. पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – सख्ख्या भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी तिन्ही आरोपींना बुधवारी २८ जून रोजी दुपारी २ वाजता जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पाचोरा तालुक्यातील लोहारा दूरक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात १ जून २०१३ रोजी दाखल असलेल्या फिर्यादीनुसार दिलीप दत्तू डांबरे यांनी वडीलांच्या मृत्यूपुर्वी त्यांच्याकडून ४ एकर शेती पैकी ३ एकर शेती विकत घेतली होती. तर उर्वरीत १ एकर शेत त्यांचा भाऊ संजय दत्तू डांबरे यांच्या नावावर करुन द्यावे. यासाठी भाऊ संजय डांबरे यांनी त्यांचे शालक बापू मधुकर बागुल, उमेश मधुकर बागुल व मित्र विजय सुरसिंग राजपूत रा. मोहाडी यांनी संगनमत केले. त्यांनी (एमएच १९ एएक्स ३७९५) क्रमांकाच्या अँपे रिक्षाने दिलीप डांबरे यांच्याशेतात अनाधिकाराने प्रवेश करीत शिवीगाळ केली.

सुनिल डांबरे, बहीण रेखाबाई व वैशाली डांबरे यांना लाकडी दांडक्याने तिघांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच मारहाण करुन चौघे जात असतांना दिलीप डांबरे हे तेथे आले असता, त्यांच्यावर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील लोहारा दूरक्षेत्र पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. हा खटला सुरु असतांना बापू मधूकर बागुल यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्धचा खटला खारीज करण्यात आला होता.

हा खटला जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यात १४ साक्षीदारांची साक्ष महत्वत्पुर्ण ठरली. तसेच सरकारपक्षाकडून साद करण्यात आलेले पुरावे व सरकारी वकीलांचा प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरुन संजय दत्तू डांबरे, उमेश मधुकर बागुल व विजय सुरसिंग राजपुत रा. मोहाडी या तिघांना दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील अँड निलेश चौधरी यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून देविदास कोळी, विजय पाटील यांनी सहकार्य केले.


 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

कांताई सभागृहात आज सायंकाळी एकादशी निमीत्त ‘बोलावा विठ्ठल’ कार्यक्रम

Next Post

शेतात काम करत असतांना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतात काम करत असतांना शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon